नवी मुंबई : बुधवारी सकाळी हार्बर रेल्वे मार्गावर एक मोठी दुर्घटना टळलीय. वाशी स्टेशनवर पेन्टाग्राफला आग लागली. परंतु, वेळीच ही आग आटोक्यात आल्यानं कुठलीही हानी झालेली नाही. आग आटोक्यात आल्यानंतर ही लोकल कारशेडला रवाना करण्यात आली.
ही लोकल सीएसटीहून पनवेलला निघाली होती. परंतु, रेल्वे वाशी स्टेशनमध्ये घुसल्यानंतर लगेचच पेन्टाग्राफला आग लागल्याचं प्रवाशांच्या लक्षात आलं. त्यानंतर स्टेशनवरच्या अग्नी सुरक्षा यंत्रणेनं ताबडतोब आग आटोक्यात आणली... आणि धास्तावलेल्या प्रवाशांना दिलासा मिळाला.
या घटनेमुळे रेल्वेसेवा थोड्या वेळेसाठी विस्कळीत झाली होती. हार्बर रेल्वे मार्गावर १०-१५ मिनिटे उशीरानं लोकल धावत होत्या. परंतु, आता मात्र ही वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे.