मुंबई : दिल्लीतील तणावानंतर मुंबईतही सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आझाद मैदानाशिवाय दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी विरोध प्रदर्शन करण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही. त्याशिवाय मुंबई शहरात संदिग्ध ठिकाणी पोलिसांची करडी नजर असणार आहे. त्यासोबतच सोशल मीडियासह नागरिकांवरही नजर ठेवून आहेत.
Maharashtra Home Ministry officials: Mumbai kept on alert after recent incidents of violence in Delhi. State Police has taken precautionary measures to maintain law&order. Other than the designated area in Azad Maidan, no permission will be granted for any other protest in Mumbai
— ANI (@ANI) February 25, 2020
पोलिसांची गुप्तचर यंत्रणा अनेक संशयित संघटनांवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान काल रात्री गेट वे ऑफ इंडियावर आंदोलन करण्याचा प्रयत्न झाल्याचं सांगण्यात येतं आहे. पोलिसांनी नागरिकांना हटवल्यानंतर आंदोलक मरीन ड्राईव्ह परिसरात आंदोलन करू लागले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. मात्र काही वेळानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. परवानगीशिवाय विरोध प्रदर्शन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.