रेल्वे प्लॅटफॉर्मवर सीन शूट करण्यासाठी किती खर्च येतो? मुंबईतली ही ठिकाणं सर्वात महाग!

रेल्वे प्लॅटफॉर्मवर चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी किती खर्च येतो? काय आहे प्रक्रिया? जाणून घ्या सविस्तर

सोनेश्वर पाटील | Updated: Jan 9, 2025, 04:18 PM IST
रेल्वे प्लॅटफॉर्मवर सीन शूट करण्यासाठी किती खर्च येतो? मुंबईतली ही ठिकाणं सर्वात महाग! title=

गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मढ आयलंड या सर्व ठिकाणांचे बॉलिवूडशी खास कनेक्शन आहे. अनेक चित्रपटाचे आणि वेब सीरीजचे शूटिंग हे सार्वजनिक ठिकाणी  करण्यात आले आहे. मात्र, या सार्वजनिक लोकेशन्सवर चित्रीकरण करण्यासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो. यावेळी अनेकवेळा कलाकारांना विनयभंगासारख्या घटनांना सामोरे जावे लागते. यामुळे कलाकार अशा ठिकाणी शूटिंग करण्यास टाळाटाळ करतात.

सार्वजनिक ठिकाणी शूटिंग करण्याची प्रक्रिया  

आज आम्ही तुम्हाला लोकेशन मॅनेजर सुरजीत सिंग, अविनाश कुमार, विनीत अभिषेक, जनसंपर्क प्रमुख, पश्चिम रेल्वे, मुंबई आणि अभिनेत्री स्माइली सूरी यांच्याशी सार्वजनिक ठिकाणी शूटिंगची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेण्यासाठी बोललो. ज्यामध्ये त्यांनी सार्वजनिक ठिकाणी शूटिंग कसं केलं जातं हे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर या ठिकाणी शूटिंग करण्यासाठी किती खर्च येतो? तसेच शूटिंगच्या दरम्यान स्थानिक लोकांना कसे सांभाळले जाते आणि या ठिकाणी रात्री शूटिंग कसे होते? याबाबत सविस्तर माहिती घेतली. 

चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी शूटिंगसाठी स्थानिक पोलीस आणि BMC कडून परवानगी घ्यावी लागते. यासाठी 7 दिवस लागतात. त्यासाठी ठराविक रक्कम भरावी लागते. परवानगी मिळाल्यानंतर त्या ठिकाणी सेट उभा केला जातो. 

लोकल ट्रेनमध्ये शूटिंग करण्याची प्रक्रिया 

रेल्वेमध्ये शूटिंग करण्याचे दोन प्रकार आहेत. एक रेल्वे प्लॅटफॉर्मवर आणि दुसरे रेल्वेच्या डब्यांमध्ये. यासाठी रेल्वेकडून विशेष परवानगी घ्यावी लागते. ज्यामध्ये ट्रेनच्या 4 डब्यांसाठी 12 तासांचे भाडे 7 लाख रुपये आहे. तर प्लॅटफॉर्मवर शूटिंगसाठी 2 लाख रुपये भाडे आकारले जाते. यामध्ये फक्त तुम्हाला रविवारीच शूटिंग करता येते. जर धावत्या ट्रेनमध्ये शूटिंग करायचे असेल तर त्यासाठी मर्यादित अंतर दिले जाते. त्याचा चार्ज देखील वेगळा आहे. शूटिंग वेळी रेल्वे विभागाच्या नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. 

जेव्हा शूटिंग सुरु असते तेव्हा प्रेक्षक गर्दी करतात. अशावेळी त्याठिकाणी बाउन्सर किंवा स्थानिक पोलीस उपस्थित राहतात. त्यासोबत कलाकार आणि क्र मेंबर्ससाठी व्हॅनिटी व्हॅनची व्यवस्था असते. 

कॉलेजमध्ये शूटिंग केल्याने चित्रपटांना खरा टच मिळतो. पण अशा ठिकाणी शूटिंग करणे सोपे नसते. त्यामुळे अनेक कलाकार कॉलेजमध्ये शूटिंग करण्यास टाळाटाळ करतात. यामध्ये छेडछाडीच्या घटना देखील घडतात. विद्यार्थी देखील प्रचंड गर्दी करतात. त्यामुळे कलाकार देखील अस्वस्थ होतात. काही वेळा कलाकारांच्या ड्रेसवर अश्लील कमेंट करतात. अशा वेळी समोरच्या व्यक्तीवर राग व्यक्त करू शकत नाही. त्यांना काही गोष्टी व्यवस्थित समजावून सांगितल्या पाहिजेत.