मुंबई : इंदुरीकर महाराज आता लसीकरणासाठी प्रबोधन करणार आहेत. राज्य सरकार लसीकरण मोहिमेसाठी इंदुरीकर महाराजांची मदत घेणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी इंदुरीकरांशी फोनवर चर्चा केली आहे. काही दिवसांपूर्वीच इंदुरीकर महाराज यांनी,‘मी लस घेतली नाही, घेणार नाही असे म्हणालो. परंतु इतरांनी लस घेऊ नये असे मी कुठेही म्हटलेले नाही,’ असे म्हटले होते.
त्यामुळे आता लस न घेणारे इंदुरीकर महाराजच लसीकरणासाठी प्रबोधन करणार आहेत. ग्रामीण भागात लसीकरणासाठी इंदुरीकर महाराजांची किर्तनातून हाक देणार आहेत. राज्यभरात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे स्वत: हिरारिने प्रयत्न करत आहेत.
अभिनेता सलमान खान हा कायमच त्याचं सामाजिक भान जपण्यासाठीही ओळखला जातो. सलमाननं आतापर्यंत कायमच विविध मार्गांनी सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला आहे. आता हाच भाईजान पुन्हा एकदा मदतीचा हात देताना दिसत आहे.
एक मोठी लढाई करण्यासाठीच सलमान रणांगणात उतरला आहे. हा लढा आहे कोरोना विषाणूवर मात करण्याचा, जिथं सलमानचं अस्त्र असणार आहे कोरोना प्रतिबंधात्मक लस.
एका व्हिडीओच्या माध्यमातून सलमाननं लसीबाबत संभ्रम असणाऱ्या सर्वांच्याच मनातील शंका दूर केल्या आहेत. 'लसीबाबत काही चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. ज्यामुळं अनेकांच्या मनातक लसीबाबत संभ्रम निर्माण होत आहे.
मी सर्वांनाच आवाहन करु इच्छितो की, लसीबाबत कोणतीही चुकीची माहिती पसरवू नका. लस घेऊन तुम्ही स्वत:ला, कुटुंबाला आणि देशाला सुरक्षित ठेवत आहात', असं सलमान म्हणाला. हात जोडून विनंती करत त्यानं कोरोना लस शक्य तितक्या लवकर घ्या असं आवाहन केलं. सोबतच पुन्हा एकदा त्यानं कोरोना प्रतिबंधात्मक सवयींची आठवण सर्वांनाच करुन दिली.
30 नोव्हेंबरपर्यंत किमान प्रत्येक व्यक्तीला एकतरी डोस मिळावा यासाठी राज्य सरकार मोहिम चालवत आहे.