संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलेल्या व्यक्तीची चौकशी फाईल्स बंद

Shiv Sena leader Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यवसायिक जितेंद्र नवलानी (Jitendra Navlani) संदर्भात केलेल्या आरोपांची चौकशी  एसआयटीने (SIT) बंद केली आहे.  

Updated: Jul 7, 2022, 10:07 AM IST
संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलेल्या व्यक्तीची चौकशी फाईल्स बंद title=

मुंबई : Shiv Sena leader Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यवसायिक जितेंद्र नवलानी (Jitendra Navlani) संदर्भात केलेल्या आरोपांची चौकशी  एसआयटीने (SIT) बंद केली आहे. राज्यात नवीन सरकार आल्यानंतर आधीच्या सरकारने चौकशी करत असलेल्या व्यक्तीची चौकशी थांबविण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (Jitendra Navlani case) 

दक्षिण मुंबईतल्या व्यवसायिक जितेंद्र नवलानीवर ईडी अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करुन वसुली रॅकेट चालविण्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. या आरोपांची चौकशी करण्याकरिता मुंबई पोलिसांची विशेष टीम ( एसआयटी ) नियुक्त करण्यात आली होती. 

नवलानी आणि ईडीचे तीन अधिकारी व्यवसायिकांकडून वसुली रॅकेट चालवत असल्याचा आरोपांची चौकशी एसआयटी करत होती. मात्र मंगळवारी एसआयटीकडून ही चौकशी बंद  करण्यात आली आहे.  याप्रकरणी  अँटी करप्शन ब्युरोने मे महिन्यात गुन्हा दाखल केला आहे ,असं म्हटलं गेल आहे. 

राज्यात काही दिवसांपूर्वीच सत्ता बद्दल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी एस आय टी चौकशी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात नवलानी आणि ईडी तर्फे मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती एन आर बोरकर यांच्या खंडपीठासमोर बुधवारी झालेल्या सुनावणी दरम्यान एसआयटी तपास बंद करण्या संदर्भात मुंबई पोलिसांन तर्फे माहिती देण्यात आली.  

वर्ष 2015 ते 2021 दरम्यान नवलानी यांनी ईडी अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करत जवळपास 58.96 कोटी रुपये अनके व्यापाऱ्यांनाकडून वसूल केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.