मुंबई : मुंबईतील ज्या आगीच्या घटनेने सर्वांनाच हादरवले त्या कमला मिल आग दुर्घटनेप्रकरणी मोजो पबचा मालक युग टुलीला हैदराबादमधून अटक करण्यात आली आहे.
मुंबईच्या कमलामिलमध्ये लागलेल्या भीषण आगीप्रकरणी मोजोस रेस्टॉरंटचा मालक यूग टुलीला हैदराबाद पोलीसांनी अटक केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. २९ डिसेंबरला मोजोस रेस्टोरंटमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा बळी गेला. त्यानंतर रेस्टोरंटच्या मालकांवर सदोष मुनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. युग टुली पहिल्या दिवसापासूनच फरार होता. काल संध्याकाळी तो हैदराबादमध्ये असल्याचं पुढे आल्यावर आज त्याला हैदराबादमधून अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय....
कमला मिल अग्नीतांडव प्रकरणी मोजोस ब्रीस्टच्या मालकांपैकी एक युग टुलीला मुंबई विशेष सत्र न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिलाय. युग टुलीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी घेण्यास नकार दिला. ११ जानेवारीला युग टुलीच्या अटक पूर्व जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयाने सुनावणी ठेवली.
आपल्याला आपल्या विरोधात पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरची प्रत मिळाली नाही, तसेच ४ तारखेपर्यंत आपल्या विरोधात एमआरटीपी अॅक्ट उल्लंघन व्यतिरिक्त कोणताही गुन्हा दाखल नव्हता. पण, अग्नीशमन दलाने ४ जानेवारीला जाहीर केलेल्या अहवालात आगीला मोजोस ब्रिस्टो इथूनच सुरुवात झाल्याचं म्हटलंय. त्यानंतर आपल्या विरोधातील कारवाईला सुरुवात झाली. तसेच अग्नीशमन दलाचा अहवाल हा हास्यास्पद असल्याचं युग टुलीच्या वकीलांनी न्यायालयात युक्तीवाद केला.
कमला मिल येथील वन अबव्ह आणि मोजोस पबला लागलेल्या आगीला आज ११ दिवस पूर्ण झाले. या आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. मात्र याप्रकरणी अद्याप फक्त मोजोस ब्रीस्टच्या मालकांपैकी एक युग पाठकला अटक झाली आहे. मोजोस आणि वन अबव्ह पब मिळून एकूण ५ आरोपी आहेत अजूनही ४ आरोपी फरार आहेत.
यापैकी क्रिपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकर या तिघांना मुंबई पोलिसांनी फरार घोषीत केले असून त्यांची माहिती देणा-याला प्रत्येकी १-१ लाखांचे बक्षिस पोलिसांनी जाहीर केलंय. शर्मेची बाब म्हणजे या सर्वांना अटक होऊ, नये याकरिता पोलिसांवर राजकीय दबाव येत असल्याचं ही बोललं जातंय.