मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : आता बातमी एका अनोख्या स्पर्धेची...मुंबईतल्या पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनने त्यांच्या चार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उद्योजक बनवण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलंय. विद्यार्थी स्पर्धकांकडून बिझनेस मॉडेल सादर करण्यास सांगितलं. त्यासाठी विद्यार्थ्यांना मदत केली जाणार आहे.
Be a job creator...Not a job seekers हा पार्ले टिळक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या entrepreneur development workshop आणि A business plan competition चा उद्देश आहे. या वर्कशॉपमध्ये चार महाविद्यालयतील 51 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून ते आपले business model या workshop मध्ये सादर करणार आहेत. अतिशय काटेकोरपणे छानणी करून या वर्कशॉपसाठी विद्यार्थ्यांची या वर्कशॉपसाठी निवड करण्यात आली आहे. या वर्कशॉपमध्ये स्पर्धेचही आयोजन करण्यात आलय. पहिल्या तीन क्रमांकांना मुलभूत आर्थिक मदत म्हणून सीड फंड बक्षिस दिलं जाणार आहे.
या वर्कशॉपमध्ये एकूण चार महाविद्यालयातील 51 विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी झाल्या आहेत. साठे महाविद्यालय, डहाणूकर महाविद्यालय, मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स आणि पार्ले टिळक इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधील विध्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या वर्कशॉपचे chief mentor असलेले दीपक घैसास यांच्या हस्ते या वर्कशॉपच उदघाटन करण्यात आलं. या वर्कशॉपमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी व्यवसायाच्या विविध कल्पना मांडणार आहेत.
'Wings to vision' या उपक्रमा अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या वर्कशॉपमध्ये भावी उद्योजक घडवले जातायेत. यातूनच भविष्यात एखादा मोठा उद्योगपती आपल्याला गवसेल अशी आशा वाटतेय.