मुंबईच्या सिने व्हिस्टा स्टुडिओ आगप्रकरण, किरीट सोमय्यांची फायर ऑडिटची मागणी

साकीनाका फरसाण मार्ट, कमला मील कम्पाऊंट पाठोपाठ काल रात्री मुंबईतल्या कांजुरमार्ग येथे सिने विस्टा स्टुडिओला आग लागली होती.

Updated: Jan 7, 2018, 07:04 PM IST
मुंबईच्या सिने व्हिस्टा स्टुडिओ आगप्रकरण, किरीट सोमय्यांची फायर ऑडिटची मागणी  title=

मुंबई : साकीनाका फरसाण मार्ट, कमला मील कम्पाऊंट पाठोपाठ काल रात्री मुंबईतल्या कांजुरमार्ग येथे सिने विस्टा स्टुडिओला आग लागली होती. रात्री या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले मात्र आज सकाळी कुलिंगचे काम सुरू असताना एक  मृतदेह हाती लागला आहे. 

गोपी वर्मा या ऑडिओ असिस्टंटचा या आगीत दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर आता मुंबईतल्या अशा स्टुडिओची फायर ऑडिटची मागणी खासदार किरीट सोमय्या यांनी केली.

शनिवारी लागलेल्या आगीत संपूर्ण स्टुडिओ जळून खाक झाला होता..  आग लागली त्यावेळेत कलाकर आणि इतर कर्मचारी शूटिंगमध्ये व्यस्त होते. त्यावेळी स्टुडिओत 150 तंत्रज्ञ आणि कलाकार उपस्थित हेते. दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळण्यात यश आलं होतं.