पीएम मोदी 8, गडकरी 40, योगींच्या 15 रॅली, महाराष्ट्रात भाजपाचे दिग्गज प्रचारात उतरणार

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी 7,995 उमेदवार मैदानात आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी स्टार प्रचारक मैदानात उतरणार आहेत. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व दिग्गज नेते प्रचारात उतरणार आहेत. 

राजीव कासले | Updated: Oct 30, 2024, 05:46 PM IST
पीएम मोदी 8, गडकरी 40, योगींच्या 15 रॅली, महाराष्ट्रात भाजपाचे दिग्गज प्रचारात उतरणार title=

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी 7,995 उमेदवार मैदानात आहेत. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवारांसाठी स्टार प्रचारक मैदानात उतरणार आहेत. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व दिग्गज नेते प्रचारात उतरणार आहेत. भाजपाच्या स्टार प्रचारकांची यादी तयार झाली असून महाराष्ट्रात पुढच्या काही दिवसात दिग्गज नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत. यात रॅली आणि जाहीर सभांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई-कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात एकूण आठ रॅली काढणार आहेत. सर्वात जास्त रॅली आणि सभा या देवेंद्र फडणवीस यांच्या असणार आहेत. याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा भाजप उमेदवारांसाठी ठिकठिकाणी रॅली आणि प्रचार सभा घेणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. 

भाजप नेत्यांच्या महाराष्ट्रात जाहीर सभा
पीएम नरेंद्र मोदी - 8
अमित शाह - 20
नितिन गडकरी - 40
देवेंद्र फडणवीस  - 50
चंद्रशेखर बावनकुळे - 40
योगी आदित्यनाथ - 15

याशिवाय गोवा, मध्य प्रदेश, हरियाणातील मुख्यमंत्रीही महाराष्ट्रात तळ ठोकून असणार आहेत. 

महायुती-महाविकास आघाडीत थेट लढत
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत आहे.  काँग्रेस, ठाकरे शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रसने महाविकास आघाडी स्थापन केली. तर भाजप, शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. यात सर्वाधिक 152 जागा भाजप लढवत आहे. 

20 नोव्हेंबरला मतदान
महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. 2019 विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 105, शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. पण निकालाना शिवसेना एनडीएतून वेगळी झाली आणि काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. 2022 मध्ये शिवसेनेत बंड झाला आणि एकनात शिंदे 40 आमदारांना घेऊन शिवसेनेतू बाहेर पडले आणि भाजपाला समर्थन दिलं. त्यामुळे शिवसेनेचे दोन पक्ष झालेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसही शरद पवार आणि अजित पवारांमध्ये विभागली गेली.