Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात किती जणांना कोरोना? तर मुंबईतला आकडा काय?

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घट होताना दिसतेय. मात्र राज्याच्या आकड्यांमध्ये (maharashtra corona update) फार काही घट होत नाहीये.   

Updated: Jan 16, 2022, 09:45 PM IST
Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात किती जणांना कोरोना? तर मुंबईतला आकडा काय? title=

मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घट होताना दिसतेय. मात्र राज्याच्या आकड्यांमध्ये फार काही घट होत नाहीये. 
राज्याची रुग्णसंख्या मात्र फारशी घटलेली नाही. महाराष्ट्रात  गेल्या 24 तासांमध्ये 41 हजार 327 रुग्ण आढळलेत, तर 29 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात राज्यात 40 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. (maharashtra corona update 14 january 2022 today 41 thousand 327 cases registred in state) 

मुंबईत किती रुग्ण?

मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये 7 हजार 895 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात 15 जानेवारीला 10 हजार 661 रुग्णांची नोंद करण्यात आली होती.

लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण

आज भारतातील लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण झालं. यानिमित्तानं केंद्रीय आरोग्यमंत्री यांनी घेतलेल्या बैठकीत सर्व फ्रंटलाईन वर्कर्सचं अभिनंदन केलं. तर जगातील सर्वाधिक यशस्वी मोहिम असं वर्णनही केलं. ट्विटरवर देखील त्यांनी देशवासियांचं अभिनंदन केलंय. रविवार सकाळपर्यंत देशात  156 कोटी 76 लाख डोस नागरिकांना देण्यात आलेत. यात पहिला आणि दुसरा तसंच बुस्टर डोसचाही समावेश आहे.