मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदेंच्या (Shiv Sena Eknath Shinde) बंडानंतर राज्याचं राजकारणात एकच भूंकप आला आहे. शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेला खंडार पडण्याची भिती व्यक्त करण्यात येतेय. त्यातच आता शिंदेंच्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) माध्यमांसमोर आले आहेत. मुख्यमंत्री त्यांच्या शासकीय विश्रामगृह वर्षाबाहेर माध्यमांसमोर आले. यावेळेस त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. (maharashtra political crieses cm uddhav thackeray come front of media after eknath shinde controversy)
शिवसैनिक या राजकीय नाट्यादरम्यान थोड्याच वेळात शक्तीप्रदर्शन करणार आहेत. एकनाथ शिंदे यांना 'मातोश्री'चे निष्ठावंत संबोधले जात होते, मात्र आता त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना झटका दिला. मात्र, शिवसेना नेतृत्वाने त्यांची पदावरुनच हकालपट्टी केली.
दरम्यान, शिवसेना शक्तीप्रदर्शन करणार आहे. आज संध्याकाळी चार वाजता सेना भवनात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं शक्तिप्रदर्शन होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर उपस्थित आमदारांना सूचना देण्यात आल्यात. आम्ही साहेबांसोबत या घोषवाक्याखाली सगळे शिवसैनिक जमणार आहेत.