St Workers Strike : एसटी कर्मचारी ऐन दिवाळीत पुन्हा संप करणार?

एसटीतील प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा ( ST Employees Salary) पगार रखडलाय. प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पगार होणं अपेक्षित असतं. 

Updated: Oct 11, 2022, 04:11 PM IST
St Workers Strike : एसटी कर्मचारी ऐन दिवाळीत पुन्हा संप करणार? title=

कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई : अवघ्या काही दिवसांवर दिवाळी (Diwali 2022) आली आहे. या आधी एसटी कर्मचाऱ्यांनी (Msrtc Employees Strike) पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसण्याचा इशारा दिलाय. महामंडळातील प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा पगार रखडल्याने संपाची भूमिका घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. (maharashtra st employee may be strike again in diwali due to suspension of salaries)

एसटीतील प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा पगार रखडलाय. प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पगार होणं अपेक्षित असतं. मात्र 10 तारीख उलटली तरी पगार मिळालेला नाही.

याआधी सरकारने कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होईल, अशी हमी दिली होती. मात्र सरकार उच्च न्यायालयाला दिलेली हमी पाळण्यास अपयशी ठरलीय. तसंच 
औद्योगिक न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केलंय. 

इतकंच नाही, तर चालक, वाहक आणि यांत्रिक कर्माचाऱ्यांचाही पगार थकलाय. पगार न झाल्याने कर्मचाऱ्यांच्या पीएफ, विमा, घराचे हफ्ते थकलेत. ज्यामुळे त्यांना मनस्ताप आणि आर्थिक चणचणीचा सामना करावा लागतोय.  दरम्यान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत काय भूमिका घेतात, याकडे राज्याचं लक्ष असणार आहे.

एसटी कामगारांच्या पगारासाठी दर महिन्याला 360 कोटी रुपयांची गरज असते. मात्र राज्य शासनाकडून केवळ 100 कोटींची तरतूद आहे. सलग 2 महिन्यांत 520 कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामुळे आता राज्य सरकार कर्मचाऱ्यांची नाराजी कशी दूर करते, याकडे लक्ष असणार आहे.