मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढतच आहे. या कोरोना व्हायरसमुळे देशातील अर्थव्यवस्था देखील कोलमडली आहे. अनेक तरूणांना नोकरीवरून काढून टाकण्यात आहे. त्यामुळे तरूणांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. अशात मराठी तरूणांनी स्वत:चा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी उमेद घेवून व्यवसायात उतरणाऱ्या तरूणांना मनसेकडून प्रोत्साहित करण्यात येत आहे.मनसेच्या एका कार्यकर्त्याने कोरोना काळात पिठलं भाकरीचा व्यावसाय सुरू केला आहे. 'वारी तृप्त खवय्यांची' अशा नावाने अस्सल मराठमोळ्या जेवणाची मेजवाणी मराठी तरूणाने सुरू केली आहे.
संकटातील संधी...'राजगड' कार्यालयातील आमचा सहकारी तुषार पाटील (9870926629) याने पिठलं - भाकरी,ठेचा व वांग्याचे भरीत असा मराठमोळा मेनू घरपोच देण्याचा व्यवसाय आजपासून सुरू केला आहे. एका मराठी तरुणाच्या या उपक्रमास आपण सर्वांनी पाठिंबा देऊन त्याचे मनोबल वाढवूया. मनःपूर्वक शुभेच्छा!! pic.twitter.com/j5cGUh2LIQ
— Shalini Thackeray (@ThakareShalini) June 6, 2020
दरम्यान, या तरूणाचे मनोबळ वाढवण्यासाठी मनसे नेत्या शालिनी पाटील यांनी पिठलं भाकरीच्या थाळीचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. 'संकटातील संधी... राजगड कार्यालयातील आमचा सहकारी तुषार पाटील याने पिठलं - भाकरी,ठेचा व वांग्याचे भरीत असा मराठमोळा मेनू घरपोच देण्याचा व्यवसाय आजपासून सुरू केला आहे. एका मराठी तरुणाच्या या उपक्रमास आपण सर्वांनी पाठिंबा देऊन त्याचे मनोबल वाढवूया. मनःपूर्वक शुभेच्छा!!' असं कॅप्शन देखील दिलं आहे.
तुषार पाटील दादर, माहिम, प्रभादेवी या भागांमध्ये विनामुल्य घरपोच सेवा पुरवणार आहे. पिठलं भाकरी, पुरणपोळी, उकडीचे मोदक, थालीपीठ, मिसळ-पाव त्याचप्रमाणे नॉनव्हेज जेवण देखील घरपोच मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला 9870926629 या क्रमांकावर साधावा लागणार आहे.