नवी मुंबई : वाशीमधले मसाला मार्केट आज बंद ठेवण्यात आलंय.
हळद, मिरची यासारख्या मसाल्याच्या पदार्थांवर याआधी कर नव्हता..आता या वस्तूवर जीएसटी लागणार आहे. त्यामुळे वाशीमधल्या मसाला आणि दाणा मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी बाजार बंद ठेवण्यात आलाय.
दरम्यान, आज मध्यरात्रीपासून जीएसटी देशभरात लागू होणार आहे. परंतु, बाजार समितीतला मंडई कर मात्र सुरूच असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांच्या मालावर शून्य टक्के कर लावावा, तसंच जाचक अटी मागे घ्याव्या, अशीही त्यांची मागणी आहे.