मुंबई : मध्य रेल्वेवर रविवारी दिवा ते कल्याण डाउन जलद मार्गावर सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर नेरुळ ते पनवेल स्थानकांदरम्यान अप आणि डाउन मार्गावर स. ११.३० ते दुपारी ४.३० पर्यंत ब्लॉक आहे. तर पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते नायगाव स्थानकांदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यत अप आणि डाउन धिम्या मार्गावर ब्लॉक घेतला आहे.
कल्याणहून सुटणाऱ्या अप जलद मार्गाच्या फेऱ्या स. १०.३७ ते दु.३.०६ पर्यंत ठाण्यापर्यंत अप स्लो मार्गावर चालवण्यात येतील. ठाणे आणि सीएसएमटीपर्यंत लोकल नियमित अप फास्ट मार्गावर चालवण्यात येतील. या लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर स्थानकावर थांबतील. स. ९.२५ ते दु. २.५४ पर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या सर्व डाउन फास्ट लोकल आपल्या निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने धावणार असून या लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड स्थानकांवर थांबतील. तसेच ब्ला दरम्यान तसेच ब्लॉक दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ५ वाजेपर्यत सीएसटीला येणाऱ्या आणि जाणाऱ्या धिम्या मार्गावरील लोकल गाडया १० मिनिटे उशिराने धावणार आहेत.
हार्बर मार्गावरील पनवेल ते नेरुळ तसंच डाऊन मार्गावरुन सकाळी ११.३० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी ११.६ वाजता ते दुपारी ४.३० वाजता पनवेल-बेलापूरहून सीएसटीएमच्या दिशेने सुटणार्या सर्व अप -डाऊन हार्बर मार्गावरील गाड्या सेवा बंद असणार आहे. तर, सकाळी ११.१४ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ठाण्याहून पनवेलला सुटणार्या सर्व डाऊन ट्रान्सहार्बर लाइन गाड्या तसंच सकाळी ११.२ ते दुपारी ४.२६ वाजेपर्यंत ठाण्यासाठी पनवेलहून सुटणाऱ्या सर्व अप-ट्रान्सहार्बर गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक दरम्यान पनवेल-अंधेरी सेवा रद्द करण्यात येणार आहेत. या काळा त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- नेरूळ आणि वाशी येथे विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत.
सांताक्रुझ आणि माहिम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.३५ ते १५.३५ या वेळेत जम्बो ब्लॉक घेतला जाईल. ब्लॉक दरम्यान अप आणि डाऊन फास्ट लोकल सांताक्रुझ आणि माहीम स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर चालतील. या ब्लॉक मुळे काही उपनगरीय सेवा रद्द करण्यात येतील,ज्याची यादी सर्व स्टेशनवर उपलब्ध असेल.