Raj Thackeray : बाळासाहेब असते तर शिवसेनेवर अशी वेळ ओढावली असती का? मनसेप्रमुख म्हणाले.....

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फुट पडली आणि राज्यात सत्तांतर झालं.   

Updated: Jul 23, 2022, 07:00 PM IST
Raj Thackeray : बाळासाहेब असते तर शिवसेनेवर अशी वेळ ओढावली असती का? मनसेप्रमुख म्हणाले..... title=

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेचे अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात सत्तानाट्य घडलं. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरुन पायऊतार व्हावं लागलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जर आज असते, तर हे शक्यच झालं नसतं, असं मनसेप्रमुख राज ठाकरे झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. (mns chief raj thackeray reaction on maharashtra political crisis on zee 24 tass exclusive interview with editor nilesh khare)

राज ठाकरे काय म्हणाले?

प्रश्न - शिवसेनेची शकलं झालेली बघायला मिळतात, अशा परिस्थितीमध्ये जर बाळासाहेब असते तर अशी परिस्थिती ओढवाली असती आज?

नाही शक्यच नाही, याच कारण ते तुम्ही शिवसेना एक पक्ष किंवा संस्था म्हणून बघू नका, ती एका विचारानं बांधली गेलेली माणसं होती. बाळासाहेब होते तोपर्यंत तो विचार होता आणि त्या विचारासोबत बांधली गेलेली माणसं होती. असेपर्यंत तो विचार होता. त्यामुळे बाळासाहेब असते तर हे शक्यच नव्हतं.

प्रश्न - मुळात ही जी परिस्थिती तयार झाली त्या परिस्थितीला तुम्ही कोणाला कारणीभूत ठरवाल? शिवसैनिक जबाबदार आहेत? की मग भाजपनं शिवसेना फोडली? की मग शरद पवारांनी शिवसेना फोडली?

मी त्या दिवशीच माझ्याकडे देवेंद्र फडणवीस आले होते. मी त्यांना म्हटलं उगाच फुकटचं श्रेय नका घेऊ नका, जी गोष्ट घडली आहे... ते हसायला लागले जोरात. जी गोष्ट घडली आहे, ती गोष्ट नाही तुम्ही घडवली, ना अमित शाहांनी घडवली, ना भाजपने घडवली ना अजून कोणी घडवली. 

याचं श्रेय तुम्हाला उद्धव ठाकरेंनाच द्यावं लागेल. जी गोष्ट घडलेली आहे त्याचं तुम्ही श्रेय कसं काय काढून घेऊ शकता? कारण हे काय एकदा घडलं नाहीय त्यांच्यामुळे. जे काय सगळे आरोप प्रत्यारोप झाले आणि सगळ्यांनी संजय राऊतना त्याला झोडून काढलं. संजय राऊतचा काय संबंधं? 

मी समजू शकतो रोज तो टेलिव्हिजनवर यायचा... त्याच्या त्या जी काय स्टाईल, अॅरोगन्स आणि त्या सगळ्यामध्ये रोज काही ना काही बोलायचा ज्याने माणसं इरिटेट होऊ शकतात. जी झाली पण नको ते. रोज रोज बोलतंय ते नको. त्याने काय आमदार फूटत नसतात. 

आमदार फुटण्याला कारणीभूत आणि या सगळ्याला मी बाहेर पडलो ज्या वेळेला कारणं तीच होती. आज आमदार फुटण्याची कारणं तीच आहेत. मध्यंतरीच्या काळात जे लोक सोडून गेले त्याची कारणं तीच आहेत. पण कारणं देखील मी त्यावेळेला मी बाळासाहेबांना सांगत होतो. माहिती नाही मला त्यावेळी मी स्कॉच खेळत होतो.