मुंबई : महाराष्ट्रातील किंवा देशातील सध्याच्या विरोधी पक्षाची स्थिती पाहता 'शॅडो' कॅबिनेटचा प्रयोग म्हणजे 'हा खेळ सावल्यांचा' नाट्यप्रयोग ठरू नये अशी टीका सामनामधून मनेसवर करण्यात आली आहे. मनसेनं१४व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली. या शॅडो कॅबिनेट मंत्रिमंडळामुळे ठाकरे कुटुंबातील दोन भावांमध्ये सामना बघायला मिळणार आहे. या शॅडो कॅबिनेटवरून शिवसेनेनं मनसेवर टीकेचा बाण सोडला आहे. यावर अमेय खोपकरांनी चांगला टोला लगावला आहे.
मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करून संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. 'शॅडो कॅबिनेटच्या नुसत्या घोषणेने रडत राऊतची तंतरली,' असं म्हणतं त्यांना खोचक टोला लगावला आहे.
शॅडो कॅबिनेटच्या नुसत्या घोषणेने रडत राऊतची तंतरली. अख्खा अग्रलेख ‘सावली’वर खर्च केल्याबद्दल ‘शॅडो’ संपादकांचे आभार. हा खेळ सावल्यांचा आत्ता कुठे सुरु झालाय. पिक्चर तो अभी बाकी है, भविष्यात ‘मोठी तिची सावली’ हा अग्रलेख लिहायला लागू नये असं काम महाखिचडीने करावं या सदिच्छा
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) March 11, 2020
यामध्ये त्यांनी म्हटलंय की,'शॅडो कॅबिनेटच्या नुसत्या घोषणेने रडत राऊतची तंतरली. अख्खा अग्रलेख ‘सावली’वर खर्च केल्याबद्दल ‘शॅडो’ संपादकांचे आभार. हा खेळ सावल्यांचा आत्ता कुठे सुरु झालाय. पिक्चर तो अभी बाकी है, भविष्यात ‘मोठी तिची सावली’ हा अग्रलेख लिहायला लागू नये असं काम महाखिचडीने करावं या सदिच्छा' असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
लोकसभेत अधिकृत विरोधी पक्षनेताच नाही व राज्यात विरोधी पक्ष अद्याप बादशाही भूमिकेतून बाहेर पडायला तयार नाही. 'शॅडो'ची घोषणा करताना त्यांच्या प्रमुख नेत्यांना छाया मंत्रिमंडळास तंबी द्यावी लागली की,'जपून करा, ब्लॅकमेल करण्याचे प्रकार करू नका.' हे बरे झाले. पुन्हा 'शॅडो' वाल्यांचे मुख्यमंत्रीपद रिकामेच आहे. या शॅडो मंत्रिमंडळास शपथ देण्यासाठी एखादा 'शॅडो' राज्यपाल नेमला असता तर योग्य ठरले असते. म्हणजे 'खेळ सावल्यांचा' अधिकच रंगतदार झाला असता. महाराष्ट्रात विनोद शिल्लक आहे. राजकारणात विनोदाला वावडे नाही हे पुन्हा दिसलं.