मुंबई : मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते मस्जिद बंदर स्थानकांदरम्यान मध्यरात्रीपासून रविवारी पहाटेपर्यंत तांत्रिक कामासाठी ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रात्री १२.२५ वाजता सीएसएमटीहून डाऊन धीम्या मार्गावरुन सुटणारी कर्जत लोकल ही शेवटची लोकल असणार आहे. तर सीएसएमटीला जाणारी शेवटची अप धीमी आसनगाव लोकल रात्री १२.१० वाजता भायखळा इथून सुटेल. अप धीम्या मार्गावरील भायखळा स्थानकातून रात्री १२.३६ ते १.१० आणि रविवारी पहाटे ४.३७ ते सकाळी ६.०६ दरम्यान अप जलद मार्गावरुन चालवण्यात येणार आहेत.
पहाटे ४.४८ ते सकाळी ६.०२ या वेळेत डाऊन धीम्या मार्गावरुन चालणाऱ्या लोकल सीएसएमटी ते भायखळा दरम्यान डाऊन जलद मार्गावरुन चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे या लोकल मस्जिद बंदर आणि सॅण्हर्स्ट रोड स्थानकांत थांबणार नाहीत. त्यामुळे या काळात प्रवासी हार्बर मार्गावरुन प्रवास करु शकतात.