निवडणुकांचा बिगुल वाजणार, मुंबई महापालिकेबाबत अत्यंत महत्वाची बातमी

मुंबई : Mumbai Ward structure : बातमी महापालिका निवडणुकीसंदर्भातील. लवकरच निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. (Mumbai Municipal election) मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना जाहीर करण्यात आली आहे. मुंबईच्या प्रभाग रचनेवर आयोगाचे शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कामाला गती येणार आहे.

मुंबई महापालिकेच्या 236 सदस्यांची संख्या निश्चित करण्यासाठी राज्य निवडणूक आयुक्तांनी हिरवा कंदील दाखवला आहे. मुंबईतील वाढीव सदस्यसंख्या तसंच प्रभाग रचना निश्चितीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेच्या अंतिम प्रभाग क्रमांक 1 पासून ते प्रभाग क्रमांक 236 पर्यंतच्या प्रभाग रचना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे, कोणता प्रभाग कोठून कुठपर्यंत असणार हे आता मुंबईकरांना माहिती होणार आहे. त्यानुसार निवडणुकीच्या कामाला गती येणार असून विविध राजकीय पक्ष आपले उमेदवार ठरवतील. त्यामुळे लवकरच निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे.  

आगामी महापालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली आहे. शहरातील 32 प्रभागात सुधारणा करण्यात आल्याचा दावा महापालिकेच्या निवडणूक शाखेकडून करण्यात आला. ओबीसी राजकीय आरक्षणा शिवाय निवडणुका घ्याव्यात आणि दोन आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्याआधी महापालिकेने प्रारूप प्रभाग रचना आराखडा प्रसिद्ध करुन त्यावरील हरकती सूचनांची कार्यवाही 10 मार्च रोजी पूर्ण केली होती. त्याचा अहवाल राज्य शासनाला पाठविण्यात आला होता. त्याचे सादरीकरण आयुक्तांनी गेल्या मंगळवारी केले होते. 

त्याला निवडणूक आयोगाने मान्यता दिली. त्यानुसार अंतिम प्रभागरचना जाहीर करण्यात आली. आगामी निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग (तीन नगरसेवकांचा एक प्रभाग) या पद्धतीने होणार आहे. त्यानुसार शहरात 58  प्रभागातून173 नगरसेवक निवडून येणार आहेत.  यातील 57 प्रभाग तीन नगरसेवकांचे तर एक प्रभाग दोन नगरसेवकांचा असेल. निवडणुकीसाठीचा प्रभागर रचनेचा अंतिम आराखडा जाहीर झाला आहे. येत्या काही दिवसात आरक्षण सोडत जाहीर होईल. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Mumbai Municipal election - Ward structure in Mumbai will change - which ward will be from where ?
News Source: 
Home Title: 

मुंबईतील प्रभाग रचना बदलणार, कोणता प्रभाग कोठून कुठपर्यंत असणार? 

निवडणुकांचा बिगुल वाजणार, मुंबई महापालिकेबाबत अत्यंत महत्वाची बातमी
Yes
No
Section: 
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
मुंबईतील प्रभाग रचना बदलणार, कोणता प्रभाग कोठून कुठपर्यंत असणार?
Publish Later: 
No
Publish At: 
Saturday, May 14, 2022 - 07:52
Request Count: 
1
Is Breaking News: 
No