Mumbai News : मुंबईकरांच्या भल्यासाठीच अटल सेतूवर एसटी धावत नाही; समोर आलं खरं कारण

देशातील सर्वात मोठा सागरी सेतू म्हणून आकारास आलेल्या आणि अनेकांसाठीच कुहूहलाचा विषय असणाऱ्या अटल सेतू अर्थात शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूचा लोकार्पण सोहळा काही दिवसांपूर्वीत पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतूचं लोकार्पण करण्यात आलं आणि त्या दिवसापासून आतापर्यंत या मार्गानं लाखो वाहनांनी प्रवास केला. मुंबई या मुख्य प्रवाहाती शहराला नवी मुंबई आणि नजीकच्या भागाशी जोडणाऱ्या आणि प्रवासाचा वेळ मोठ्या फरकानं कमी करणाऱ्या या अटल सेतूमुळं शहरातील वाहतुकीतही बरेच सकारात्मक बदल झाले. 

सायली पाटील | Updated: Feb 9, 2024, 10:05 AM IST
Mumbai News : मुंबईकरांच्या भल्यासाठीच अटल सेतूवर एसटी धावत नाही; समोर आलं खरं कारण  title=
Mumbai news why msrtc st buses are not travelling from atal setu route latest update in marathi

Mumbai Trans Harbour Link Atal Setu : देशातील सर्वात मोठा सागरी सेतू म्हणून आकारास आलेल्या आणि अनेकांसाठीच कुहूहलाचा विषय असणाऱ्या अटल सेतू अर्थात शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूचा लोकार्पण सोहळा काही दिवसांपूर्वीत पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतूचं लोकार्पण करण्यात आलं आणि त्या दिवसापासून आतापर्यंत या मार्गानं लाखो वाहनांनी प्रवास केला. मुंबई या मुख्य प्रवाहाती शहराला नवी मुंबई आणि नजीकच्या भागाशी जोडणाऱ्या आणि प्रवासाचा वेळ मोठ्या फरकानं कमी करणाऱ्या या अटल सेतूमुळं शहरातील वाहतुकीतही बरेच सकारात्मक बदल झाले. 

अशा या अटल सेतूवरून नवी मुंबईतील कोकण भवन, बेलापूर ते कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर इथपर्यंतच्या बेस्ट प्रवासाला परवानगी मिळाली असून, चाचणी फेरीनंतर आता या प्रवासासाठीच्या प्रवास भाड्याची निश्चिती करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. इथं अटल सेतूवरून बेस्ट बसचा प्रवास होणार हे आता जवळपास ठरलं असलं तरीही एसटी बसचा मात्र या मार्गावरून प्रवास अद्यापही शक्य नसल्याचं स्पष्ट होत आहे. 

हेसुद्धा वाचा : ये हुई ना बात! आता अटल सेतूवरून बेस्ट बसनं करा प्रवास; पाहा कसा असेल मार्ग

 

सर्वेक्षण झालं पण पुढे... 

अट सेतूवरून एसटी बसच्या प्रवासासाठीच्या चर्चा आणि त्यानंतर सर्वेक्षणही पार पडलं. पण, एसटीसाठी हा मार्ग निवडल्यास नवी मुंबई आणि मुंबईदरम्यान येणाऱ्या जवळपास 22 थांब्यांना आणि येथील प्रवाशांना गैरसोय होणार हे वास्तव नाकारता येत नाही. शिवाय याचा थेट परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावरही होणार आहे. त्यामुळं तूर्तास अटल सेतू आणि लालपरीची गाठभेट शक्य नाही असंच स्पष्ट होत आहे. दरम्यान, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठीचेही प्रयत्न सध्या सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. 

एसटीच्या बाबतीतही हेच चित्र पाहायला मिळतं. अटल सेतूमुळं 5 किमीचं अंतर कमी होत असलं तरीही दादर, कुर्ला नेहरुनगर, मैत्री पार्क, मानखुर्द, वाशी, सानपाडा, नेरुळ, खाघर, कळंबोली आणि पनवेल येथून पुणे, अलिबाग, कोकण आणि कोल्हापूरासह राज्याच्या इतर भागांमध्ये जाणाऱ्या एसटीनं प्रवासी प्रवास करतात. यापैकी महत्त्वाच्या ठिकाणांवरव एसटीची तिकीट आरक्षण केंद्रही आहेत. शिवाय या प्रवासांदरम्यान 22 शहर थांबे असून, तिथं लांब पल्ल्याच्या बस थांबतात. त्यामुळं इथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आता पर्याय शोधला जात आहे.