मुंबई : पहाटेपासून कोसळणारा पाऊस आणि जागोजागी होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेता आज मुंबईतल्या सर्व शाळांना प्रशासनानं सुट्टी जाहीर केलीय. सकाळच्या वेळेत सुरू असणाऱ्या शाळा लगेचच सोडून देण्याचे आदेश देण्यात आलेत. दुपारच्या वेळी भरणाऱ्या शाळांना सुट्टी देण्यात आलीय.
#Mumbai: People wade through waterlogged streets in Dadar's Hindmata area. #MumbaiRains pic.twitter.com/Fas1JIG10H
— ANI (@ANI) July 3, 2018
दरम्यान, सायन आणि माटुंगा स्टेशनवर रेल्वे रुळांवर पाणी साचलंय. त्यामुळं मध्य रेल्वेची वाहतूक दहा ते पंधरा मिनिटं उशीरानं सुरू आहे... तर कुर्ला, टिळक नगर स्टेशनवरदेखील रुळांवर पाणी साचल्यामुळं हार्बर रेल्वेचाही वेग मंदावलाय. गोवंडी ते कुर्ला दरम्यान हार्बर रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे.
#Mumbai: Railway tracks submerged under water at Sion Railway Station following heavy rainfall. pic.twitter.com/k5PmiRBDWn
— ANI (@ANI) July 3, 2018
अंधरी पुल दुर्घटनेमुळे पश्चिम रेल्वेमार्गावरची दोन्ही बाजूची रेल्वेसेवा अद्याप सुरु झालेली नाही...त्यामुळे नोकरदारांचे मोठ्या प्रमाणात हाल होतायत...नोकरीसाठी घराबाहेर पडलेल्या नोकरदारांना रेल्वे स्थानकातच थांबाव लागतंय...वसई आणि नालासोपारा, बोरिवली रेल्वे स्थानकातली ही दृश्य असून...मुंगीलाही आत शिरायला जागा उरलेली नाही अशीच रेल्वे स्थानकांची दशा झालीय...कुठचीही अनाऊंसमेंट होत नसल्यामुळे मुंबईकरांना काय करावं याबाबत प्रश्नचिन्ह आहेत... रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाली असून..रेल्वे कधी सुरु होतेय याच्याच प्रतीक्षेत नोकरदार आहेत.