PM Narendra Modi : वार्षिक G20 (Development Working Group) शिखर परिषदेची सुरूवात बाली, इंडोनेशिय येथून सुरू झाली आहे. यामध्ये कोविड-19 या जागतिक महामारीमुळे (corona) निर्माण झालेली आव्हाने आणि रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला यावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर आता आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत (Mumbai News) 13 ते 16 डिसेंबर याकाळात विकास विषयक कार्यगटाची बैठक होणार आहे. या जी- 20 परिषेदेसाठी राज्य सरकारने तयारीचा वेग वाढविला आहे. दरम्यान आजपासून (16 December) मुंबईतील बिकेसी (BKC center) सेंटर येथे या बैठकीला सुरुवात होणार आहे. मात्र सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न असा आहे की, हे जी-20 काय आहे (What is G20) ज्यावर संपूर्ण जगाच्या नजरा खिळल्या आहेत.
महाराष्ट्रात (maharashtra news) आजपासून (13 डिसेंबर) जी 20 परिषदेच्या बैठकांना मुंबईत सुरूवात होणार असून मुंबई शहर सज्ज झाले. राज्याची सांस्कृतिक परंपरा, खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवितानाच राज्यात गुंतवणूकीसाठी क्षमता असलेल्या क्षेत्रांची ओळख देखील परदेशी पाहुण्यांना करून दिली जाणार आहे. या परिषदेअंतर्गत महाराष्ट्रात एकूण 14 बैठका होणार असून त्यातील आठ बैठका मुंबईत पार पडणार आहेत. त्याशिवाय पुण्यात 4 तर नागपूर आणि औरंगाबादेत प्रत्येकी एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे.
परदेशी पाहुण्यांचे फेटे बांधून स्वागत
याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुंबई शहराच्या सजावटीमध्ये कुठलीही उणीव भासू देऊ नका, असे सांगतानाच परिषदेसाठी येणाऱ्या परदेशी पाहुण्यांचे महाराष्ट्राच्या परंपरेनुसार फेटे बांधून स्वागत करावे, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. मुंबईची (Mumbai G20 Summit) ओळख असलेले कोळी बांधव आणि त्यांचे पारंपरिक वेशातील कोळी नृत्याने पाहुण्यांचे स्वागत करतानाच राज्याची खाद्यसंस्कृती, लोककला यांचे दर्शन घडवितानाच महाराष्ट्र गुंतवणूकीसाठी संधी असलेल्या क्षेत्रांची ओळख देखील जी 20 परिषदेतील पाहुण्यांना झाली पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
वाचा : या मार्गावरील वाहतूक बंद, शाळांबाबत संभ्रम
काय आहे G20?
डेव्हलपमेंट वर्किंग ग्रुप G20 असे म्हणतात. त्याची स्थापना 1999 साली झाली. युरोपियन युनियन आणि 19 देशांचा अनौपचारिक गट आहे. त्याचे नेते दरवर्षी G20 शिखर परिषदेत एकत्र येतात आणि जागतिक अर्थव्यवस्थेला पुढे कसे आणायचे यावर चर्चा करतात.
G20 ची स्थापना केव्हा झाली?
G20 परिषद डिसेंबर 1999 मध्ये जर्मनीची राजधानी बर्लिन येथे आयोजित करण्यात आली होती. 2008 साली जगाला मंदीचा सामना करावा लागला. तेव्हा या संघटनेतही बदल झाले आणि तिचे रूपांतर आघाडीच्या नेत्यांच्या संघटनेत झाले. यानंतर G20 राष्ट्रांच्या नेत्यांची वर्षातून एकदा बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. 2008 साली अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथे आयोजित करण्यात आली होती. तर G-20 मध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, युरोपियन युनियन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स अमेरिकेचा समावेश आहे.