मुंबई : मुंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकल ट्रेनने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. मात्र, याच लोकल ट्रेनवर दगड भिरकावण्याचे प्रकार सर्रासपणे घडत आहेत. आता पून्हा एकदा असाच एक प्रकार समोर आला आहे.
लोकल ट्रेनवर करण्यात आलेल्या दगडफेकीत घाटकोपर येथे राहणाऱ्या ६१ वर्षीय अश्विनी या जखमी झाल्या आहेत. त्यांच्या डोक्याला दगड लागल्याने दुखापत झाली आहे.
घाटकोपर येथे राहणाऱ्या अश्विनी लोकल ट्रेनने प्रवास करत होत्या. चेंबूर दरम्यान अज्ञात इसमाने लोकल ट्रेनवर दगड भिरकावला आणि तो थेट अश्विनी यांच्या डोक्याला लागला.
या घटनेत अश्विनी यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर त्यांना वाशी येथील रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.