मुंबई : पुढील चार दिवस राज्यात मान्सून रजेवर जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय. ११ जुलैपर्यंत कोकण वगळता राज्यात पावसाचा जोर कमी राहणार आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत नसल्यानं पावसानं दडी मारलीये. पावसाचा जोर ओसरल्यानं मात्र शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलंय.
जुलैच्या १२ अथवा १३ तारखेपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केलीये.