मुंबई: देशातील कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचे मुख्य केंद्र असलेल्या मुंबईतील आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांवर सध्या प्रचंड ताण आहे. या कर्मचाऱ्यांना पीपीई किटस् आणि अन्य सुविधांच्या तुटवडयामुळे अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. राज्य सरकार या सर्व अडचणी दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर आता OLA कंपनी मुंबई महानगरपालिकेच्या मदतीला धावून आली आहे.
राज्यात लॉकडाऊनचा या ठिकाणी अक्षरश: फज्जा, सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी
OLA ने मुंबईत अत्यावश्यक वैद्यकीय वाहतुकीसाठी पालिकेशी भागीदारी केली आहे. त्यानुसार OLA कडून पालिकेला प्रत्येक वॉर्डात आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी टॅक्सी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच आरोग्य यंत्रणेला पुरक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही प्रत्येक वॉर्डात ये-जा करण्यासाठी किंवा घरून कामाच्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी OLA कडून कॅब उपलब्ध करून दिल्या जातील. यामुळे मुंबईतील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रवासाचा त्रास कमी होण्याची शक्यता आहे.
Ola has partnered with Brihanmumbai Municipal Corporation (BMC) to enable essential medical trips in Mumbai. BMC has been provided with dedicated cars for every ward in the city to ferry health workers and paramedical staff across wards and their homes: Ola Statement. #COVID19
— ANI (@ANI) April 15, 2020
यंदाच्या वर्षी असं असेल पर्जन्यमान; शेतकरी वर्गाने जरुर वाचा
मुंबई शहरात आज सकाळपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये तब्बल १८ ने वाढ झाली आहे. भाटिया रुग्णालयात १० कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. आज दादरमध्ये आणखी दोन तर माहिममध्ये कोरोनाचा नवा रुग्ण सापडला आहे. तर धारावीत कोरोनाचे ५ रुग्ण वाढलेत. मुंकुंदनगर परिसरातील रुग्णांची संख्या १४वर पोहोचली आहे. तर धारावीत कोरोना रुग्णांची एकूण संख्या ६०वर पोहोचली आहे. धारावी आणि इतर भागातील झोपडपट्टीच्या परिसरात वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण पालिकेच्यादृष्टीने चिंतेची बाब आहे. यासाठी आता महापालिकेकडून लवकरच शहरातील हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी रॅपिड टेस्टला सुरुवात करण्यात येणार आहे.