ठाणे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कोरोना व्हायरसची सद्यस्थिती आणि राज्य सरकारची त्यावर असणारी भूमिका, त्यासाठी उचलली जाणारी पावलं यावरल आपली प्रतिक्रिया दिली आहे. ठाणे येथे एका पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणाही साधल्याचं पाहायला मिळालं. शिवाय यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊ यांना निशाण्यावर घेत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
आपल्याला राज्यात सध्या सत्तेवर असणारं महाविकासआघाडी सरकार पाडण्याची कोणतीही घाई नाही, असं म्हणत हे सरकार त्यांच्यातील अंतर्विरोधामुळेच पडेल असा सूर त्यांनी आळवला. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी विरोधक प्रयत्नशील असल्याचं अनेकदा म्हटलं गेलं याबाबतच फडणवीस यांनी आपली बाजू स्पष्ट केली. सरकारचं अपयश झाकायचं असेल तेव्हा संजय राऊत सरकार पाड्याबाबत लेख लिहून लक्ष वळवतात, असं म्हणत त्यांनी राऊतांवर बोचरी टीका केली.
फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यासोबतच राज्यातील आणि विशेष म्हणजे ठाण्यामध्ये अतिशय झपाट्यानं वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या परिस्थितीकडे सर्वांचं लक्ष वेधलं. यावेळी राज्य सराकरनं कोरोनाच्या चाचण्यांची संख्या वाढवण्याची विनंतीही त्यांनी शासनाकडे केली.
ठाणे | कोरोनाच्या कमी चाचण्या करून कमी रुग्ण संख्या दाखवण्याचा प्रकार या MMRमध्ये सुरू आहे. राज्य सरकारला कळकळीची विनंती आहे की चाचण्यांची संख्या वाढवली पाहिजे- देवेंद्र फडणवीस https://t.co/HOK58cBO5u pic.twitter.com/2Tl9zZpusU
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 6, 2020
राज्यातील एमएमआर क्षेत्रांचा दौरा केल्यानंतर या भागांमध्येच सर्वाधिक कोरोना रुग्ण आणि सर्वाधिक कोरोना रुग्णांचे मृत्यू होत असल्याचं म्हणत अनुक्रमे ही आकडेवारी ६० आणि ७३ टक्के असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं. शिवाय या भागांमध्ये समन्वय नसल्यामुळं चाचणीचे निकाल मिळण्यासही दिरंगाई होत असल्याची वस्तुस्थिती त्यांनी सर्वांपुढं ठेवली.
मराठा आरक्षणाबाबत म्हणाले...
मराठा आरक्षणाच्या मुद्द्याबाबत आपलं मत मांडताना त्यांनीह हा विषय राजकारणापलीकडचा असल्याचं सांगितलं. 'आता SC मध्ये ही केस आहे, यामध्ये सरकारचे लक्ष असणं आवश्यक आहे, काही मुद्दे उपस्थित केले तर त्यावर उत्तर द्ययायची तयारी राज्य सरकारने करायची असते', असं ते म्हणाले.