लतादीदींना साक्षात पाहिल्याने आपण भाग्यवान, पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांना पहिला लता मंगेशकर पुरस्कार ( lata mangeshkar award)  प्रदान करण्यात आला आहे.

Updated: Apr 24, 2022, 06:29 PM IST
लतादीदींना साक्षात पाहिल्याने आपण भाग्यवान, पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांना पहिला लता मंगेशकर पुरस्कार ( lata mangeshkar award)  प्रदान करण्यात आला आहे. मंगेशकर कुटुंबियांच्या हस्ते मोदींना हा पुरस्कार देण्यात आला. मोदींनी हा पुरस्कार देशवासियांना समर्पित केला. हा पुरस्कार सोहळा मुंबईतील षणमुखानंद सभागृहात पार पडला. या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती.  (prime minister narendra modi recive 1st lata mangeshkar award at shanmukhananda hall mumbai)

मोदी यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर मंगेशकर कुटुंबियांसोबत असलेल्या आठवणींना उजाळा दिला. तसेच लतादीदींसोबत पहिली भेट कधी आणि कोणामुळे झाली, याबाबतही मोदी म्हणाले. 

मोदी काय म्हणाले?

"लतादीदी वयासोबत कर्मानेही मोठ्या होत्या. सुधीर फडके यांच्यामुळे लतादीदींसोबत ओळख झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत माझं जवळंचं नातं आहे. संगीताची शक्ती लतादीदींमधून दिसली. संगीत एक साधना आहे आणि भावना आहे. लतादीदीचं स्वर हे युवांसाठी प्रेरणा आहे. दीदींनी संगीत जगतावर छाप सोडली", असं मोदी म्हणाले.

राजकीय क्षेत्रात केलेल्या कामगिरीसाठी काही दिवसांपूर्वी मोदींना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मोदी आज मुंबईत आले. लता दीदी आणि मोदी यांचे भावा-बहिणीचं नातं होतं.