Raj Thackeray Rally In Thane : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाणे येथे उत्तरसभा घेतली. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी घेतलेल्या सभेत मशिदीवरील भोंगे आणि मदरसे याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या. यावर आज राज ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. सभेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते ठाण्यात आले आहेत.
राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे समान नागरीक कायदा आणा अशी मागणी केली आहे. ठाण्याच्या उत्तर सभेत बोलताना राज ठाकरेंनी या मागणी केली आहे. तसेच लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी ही कायदा आणा अशी मागणी केली आहे.
'मोदींच्या सरकारने जेव्हा ३७० कलम हटवलं तेव्हा अभिनंदन करणारा मी पहिला व्यक्ती होतो. मोदींसारखा व्यक्ती पंतप्रधान व्हावा. हे बोलणारा पहिला व्यक्ती देखील मीच होतो.'
'मोदींच्या काही भूमिका नाही पटल्या. तर त्यावर बोललो. ईडीची नोटीस आली म्हणून ट्रॅक बदलला. असं काही जण म्हणाले. पण ईडीची नोटीस आल्यानंतर मी ईडी ऑफीसला गेलो. पवारांना चाहुल लागली तरी किती नाटक केलं. ज्या हातांनी पापच केलं नाही. मग कोणतीही नोटीस येऊ दे.'