मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. अशात भाजपने सरकारविरूद्ध २२ मे रोजी 'महाराष्ट्र बचाव आंदोलनाची' घोषणा केली आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून भाजप कार्यकर्ते सरकारचा निषेध करणार आहेत. पण आंदोलनापूर्वीच सोशल मीडियावर भाजपाचे नेते राम कदम आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे. महाराष्ट्र धर्म आम्हाला शिकवण्या ऐवजी, स्वतः आत्मचिंतन करा ! चोराच्या उलट्या बोंबा असं म्हणत राम कदम यांच्या सरकारवर निशाना साधला आहे.
राम कदम यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्यांनी सद्य परिस्थिती संबंधित अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 'आज लॉकडाऊनचा ५८ वा दिवस आहे. या दिवसांमध्ये तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला १ रूपयांचा तरी पॅकेज दिला आहे का? महाराष्ट्राच्या जनतेची घराघरात उपासमार सुरू आहे. रिक्षा, टॅक्सी, घरकाम करणाऱ्याचं घर कसं चालत असेल याची चिंता तुम्हाला आहे का?'
महाराष्ट्रधर्म आम्हाला शिकवण्याच्या ऐवजी , स्वतः आत्मचिंतन करा ! चोराच्या उलट्या बोंबा योग्य नव्हे . https://t.co/CdLfoIJqdy pic.twitter.com/E1n5MTWyxo
— Ram Kadam (@ramkadam) May 21, 2020
असे एकना अनेक प्रश्न राम कदम यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केले होते. 'महाराष्ट्र बचाव आंदोलना' संबंधी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सूचना देणारं एक पत्रक काढलं. हे पत्रक जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट करत अनेक आक्षेप नोंदवले आहेत.
चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपा कार्यकर्त्यांना, आंदोलनात कोणते कपडे घालावेत, कोणत्या घोषणा द्याव्यात, बातम्या कशा पाठवाव्यात याचे आदेश देण्यापेक्षा 'महाराष्ट्रधर्म' पाळण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले असते, तर अधिक संयुक्तिक ठरले असते.
दो गज की दूरी, सत्ता की लालच बुरी! pic.twitter.com/RC0QOIOfNC— Jayant Patil (@Jayant_R_Patil) May 20, 2020
त्यानंतर भाजपा नेते राम कदम यांनी जयंत पाटलांच्या वक्तव्यावर निशाना साधत ट्विटरच्या माध्यमातून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या पत्रकावरून राजकारण चांगलंच तापत असल्याचे दिसून येत आहे.