मुंबई : आदित्य ठाकरेंचा महत्त्वाकांक्षी रूफटॉप हॉटेलचा प्रस्ताव पास करण्याची संधी शिवसेनेनं गमाववली. शिवसेनेच्या महापालिका पदाधिका-यांनी आदित्य यांना तोंडावर पाडलं. रुफ टॉप हॉटेल प्रस्तावाच्या विरोधात असणाऱ्या भाजप आणि कॉग्रेसनं ऐनवेळी सभात्याग करुन सेनेला रुफ टॉप हॉटेल प्रस्ताव बिनविरोध पास करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करुन दिली होती.
मात्र, आयत्या वेळी सेनेचे सभागृह नेते यशवंत जाधव यांनी कचऱ्याच्या मुद्दयावर सभा तहकुबी मांडून ही संधी गमावली. गेली ३ वर्षे हा प्रस्ताव पास करून घेण्यासाठी शिवसेना पदाधिकारी धडपडत आहेत. मात्र सगळं काही जुळून आलं असताना शिवसेनेनं संधी गमावली.