२६/११ हल्ल्यातील शहिदांना वाळू कलाकाराची अनोखी मानवंदना

मुंबईवर २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याला ९ वर्षं पूर्ण झालीत. या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या पोलिसांना वाळू कलाकार मच्छिंद्र शिंदे यांनी अनोखी आदरांजली वाहिलीय.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 26, 2017, 05:02 PM IST
२६/११ हल्ल्यातील शहिदांना वाळू कलाकाराची अनोखी मानवंदना title=

मुंबई : मुंबईवर २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याला ९ वर्षं पूर्ण झालीत. या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या पोलिसांना वाळू कलाकार मच्छिंद्र शिंदे यांनी अनोखी आदरांजली वाहिलीय.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

मुंबईमध्ये २६ नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यामध्ये १६० हून अधिक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर, ३०० हून अधिक जण जखमी झाले होते.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या हल्ल्यातील शहीदांना आदरांजली वाहिली आहे. केवळ भारतच नव्हे तर जगातील सर्व मानवतावादी शक्तींनी एकत्र येऊन दहशतवादाला पराभूत करावे लागेल असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

दहशतवादाची पाळंमुळं नष्ट करायची असतील, तर मानवतावादी देशांना एकत्र येण्याची गरज असल्याचंही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.