मुंबई: सत्तास्थापनेचा घोळ घालायचा आणि सूत्रे अप्रत्यक्ष आपल्या हाती ठेवायची हे घटना विरोधी आहे, अशी टीका 'सामना'तून करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीतल्या वक्तव्यावरून शिवसेनेने भाजपला टोले दिलेत आणि मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली. सरकारसाठी लागणाऱ्या बहुमताचा आकडा गोळा करण्यात पुढचे चारेक दिवस जातील. पण ती कसरत म्हणजे दिल्लीच्या गढूळ धुक्यात विमान उतरवण्यासारेखच आहे, असे या अग्रलेखात म्हटले आहे.
मात्र, महाराष्ट्रात लवकरात लवकर सरकार स्थापन होणे गरजेचे आहे. लोकांचा तो अधिकार आहे, पण सत्तास्थापनेचा घोळ घालायचा, खोळंबा करायचा व त्या परिस्थितीचा लाभ घेऊन सरकार नसतानाही अप्रत्यक्ष सूत्रे हातात ठेवून राज्यकारभार हाकायचा, हे घटनाविरोधी आहे. नवे राज्य मोकळ्या वातावरणात यावे, पण एकदाचे राज्य यावे हीच अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिला आहे. मरहाटी जनतेला कमी लेखू नका, असा इशाराही शिवसेनेने या अग्रलेखातून भाजपला दिला आहे.
साहेब आपण करून दाखवलं; मातोश्रीबाहेर झळकले पोस्टर्स
दरम्यान, शिवसेनेच्या आक्रमक आणि ताठर भूमिकेकडे राज्यातील सत्तास्थापनेची कोंडी फोडण्याची जबाबदारी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच पडली आहे. अमित शाह यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री मोदींची भेट घेण्यासाठी थांबले. मात्र, नंतर मोदींची भेट न घेताच ते मुंबईकडे रवाना झाले. रात्री उशीरा मुख्यमंत्री मुंबईत परतले. आता सत्तासंघर्षाला आज कोणते वळण लागते, याकडे साऱ्यांचे लागले आहे.