मुंबई : शेतकऱ्यांनो कर्जमाफीचा फॉर्म भरला नसेल तर चिंता करू नका, असं राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटलं आहे, त्यासोबत शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे अर्ज भरण्याची तारीख देखील वाढवली जाणार नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
ज्या शेतकऱ्यांना अर्ज भरता आला नाही, त्यांच्यासाठी नंतर नक्कीच वेगळा विचार केला जाईल, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे, तसेच बँकानी दिलेली माहिती आणि शेतकऱ्यांनी दिलेली माहिती याची पडताळणी १ ऑक्टोबरपर्यंत केली जाणार आहे, त्यानंतर १ ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार असल्याचं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलंय.