मुंबई : थर्टी फर्स्ट आणि नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांमध्ये यंदा बिअर मिळण्याची शक्यता कमी झालीय. उत्पादन शुल्क विभागाने बिअरवरचा कर वाढविल्याने ती महाग होणार आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील बिअर उत्पादक कंपन्यांनी दोन महिन्यांपासून उत्पादन कमी केलं असून सध्या बार किंवा वाईन शॉपमध्येही बिअर मिळत नाही. त्यामुळे बिअर पिणाऱ्या मद्यप्रेमींना थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनमध्ये यंदा दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे. तर बिअर विक्रेत्यांचा बिअर मागचं मार्जिन कमी करण्यात आलंय.
आधीच बिअरचा तुटवडा आणि त्यात आता बिअर महाग होणार आहे. म्हणजेच 40 ते 45 रुपयांनी महाग होणार आहे. त्यामुळे बिअरच्या विक्रीमध्ये 50 टक्के घट झालीय असं बिअर विक्रेते सांगताहेत.