मुंबई : सरपंचाची निवड आता पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून होणार आहे. ग्रामविकास विभागाने हा निर्णय घेतला आहे. आधीच्या देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप सरकारचा निर्णय महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने रद्द केला आहे. हा फडणवीस यांना मोठा धक्का मानला जात आहे.
#BreakingNews । मतदारांमधून थेट सरपंच निवडणूक रद्द । पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंच निवडणूक होणार । राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय ।भाजप सरकारने थेट लोकांमधून सरपंच निवडीचा घेतला होता निर्णय । भाजपचा हा निर्णय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारकडून रद्दhttps://t.co/kpo9phDaSR pic.twitter.com/SpQzErooBO
— ZEE २४ तास (@zee24taasnews) January 29, 2020
सरपंचांची निवड लोकांमधून थेट निवडणुकीऐवजी आता निवडून आलेल्या सदस्यांमधूनच करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या दृष्टीने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामधील कलम ७, कलम १३, कलम १५, कलम ३५, कलम ३८, कलम ४३, कलम ६२, कलम ६२अ मध्ये सुधारणा आणि कलम ३०अ-१ब व कलम १४५-१अ चा नव्याने समावेश करण्यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत आज पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आले.#मंत्रिमंडळनिर्णय pic.twitter.com/9djM4DO1vx
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 29, 2020
याशिवाय खर्चाच्या विवरणाच्या संदर्भात सुधारीत वेळापत्रकात बदल करण्यास मंजूरी देण्यात आली. संबंधित कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात येणार आहे.