विरोधकांचा सीएए-एनपीआर ठराव, विधानसभेत आज चर्चा होण्याची शक्यता

विरोधी पक्षाने दिलेला सीएए, एनपीआरच्या चर्चेच्या ठरावावर आज विधानसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे.   

Updated: Mar 11, 2020, 07:40 AM IST
विरोधकांचा सीएए-एनपीआर ठराव, विधानसभेत आज चर्चा होण्याची शक्यता title=
संग्रहित छाया

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसर्‍या आठवड्याची आज सुरुवात होत आहे. मागील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पावर या आठवड्यात चर्चा सुरू होईल. तेव्हा विरोधक सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. दुसरीकडे विरोधी पक्षाने दिलेला सीएए, एनपीआरच्या चर्चेच्या ठरावावर आज विधानसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे. 

या ठरावावर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये असलेले मतभेद समोर आणण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. जिल्हा वार्षिक नियोजन निधीत विदर्भाला मिळालेल्या कमी निधीचा मुद्दाही भाजपकडून उपस्थित केला जाऊ शकतो. या मुद्यावरून सरकार विदर्भावर अन्याय करत असल्याचा मुद्दा विरोधक आक्रमकपणे विधिमंडळात मांडू शकतात.

0