मुंबई : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी दिलासा दायक बाब म्हणजे कोरोना सारख्या धोकादायक विषाणूच्या विळख्यातून बाहेर येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. देशात आतापर्यंत ७४ लाख ३२ हजार ६८० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी ६५ लाख २४ हजार ५९५ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून ७ लाख ९५ हजार ८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री अनिल परब यांना दिखेल करोनाची बाधा झाली होती. मात्र उपचारानंतर ते सुखरूप घरी परतले आहेत. कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आल्याची माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
कोविड१९ चे निदान झाल्यामुळे मी गेल्या सोमवारी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो होतो. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व आशिर्वादाने मला कमीतकमी वेळेत डिस्चार्ज मिळाला असून मी आज सुखरूप घरी परतलो.
— Anil Parab (@advanilparab) October 17, 2020
ट्विट करत ते म्हणाले, कोविड१९ चे निदान झाल्यामुळे मी गेल्या सोमवारी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो होतो. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व आशिर्वादाने मला कमीतकमी वेळेत डिस्चार्ज मिळाला असून मी आज सुखरूप घरी परतलो. असं ते म्हणाले.
शिवाय, काही दिवसांच्या विलगीकरणानंतर मी आपल्या सेवेसाठी पुन्हा सज्ज होईन. आपण माझ्याप्रती दाखवलेल्या प्रेम व शुभेच्छांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन. असं ट्विट करत त्यांनी आभार मानले आहेत. परब यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते.