नवी दिल्ली : शेतातील पिकावर किटकनाशक फवारताना विषबाधा होऊन मृत्यू पावलेल्या १८ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारने २ लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्य मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्याता आला. शेतातील पिकावर फवारणी करताना या शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घेतली नाही. त्यामुळे १८ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तर, तब्बल ५४६ शेतकऱ्यांची स्थिती गंभीर आहे. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
विदर्भात मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाणाऱ्या कपाशी आणि सोयाबीन पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. सततच्या नापीकीला कंटाळलेला शेतकरी हैराण झाला आहे. त्यामुळे कपाशीवरील किड आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी किटकनाशकांचा वापर फवारणी करताना करत आहे. दरम्यान, अशा वेळी योग्य ती काळजी न घेतल्याने शेतकऱ्यांना विषबाधा होत आहे.