मुंबई : राज्यातील सहा जागांसाठी घेण्यात आलेल्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल आज लागला आहे, सहा पैकी पाच जागांचा निकाल जाहीर झाला आहे. तर उस्मानाबाद-लातूर-बीडचा निकाल पुढे ढकलण्यात आला आहे. यात शिवसेनला २ ठिकाणी तर भाजपा देखील २ ठिकाणी विजय मिळाला आहे, तर राष्ट्रवादीला कोकणातील एक जागा हाती लागली आहे. विदर्भातील वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली विघान परिषदेच्या जागेत भाजपाने काँग्रेसला धक्का देत, भाजपाचा उमेदवार विजय झाला आहे. आजच्या निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेला, कोकणात राष्ट्रवादीला, तर विदर्भातील ३ जागांपैकी १ जागा शिवसेनेला तर २ भाजपाला मिळालेल्या आहेत. विधान परिषदेचा संपूर्ण निकाल खालील प्रमाणे...
विजेता - भाजप 2, शिवसेना 2 आणि राष्ट्रवादी 1
1) नाशिक विधान परिषद : नरेंद्र दराडे - शिवसेना
2) रायगड विधान परिषद : अनिकेत तटकरे - राष्ट्रवादी
3) परभणी-हिंगोली विधान परिषद : विप्लव बाजोरिया - शिवसेना
4) अमरावती विधान परिषद : प्रविण पोटे - भाजप
5) वर्धा चंद्रपूर गडचिरोली : रामदास अंबटकर - भाजप
6) उस्मानाबाद-बीड-लातूर जागेसाठी मतमोजणीची तारीख अद्याप निश्चित नाही