मुंबई : संजय देशमुख यांची हकालपट्टी झाल्यानंतर आता मुंबई विद्यापीठाचे नवे कुलुगुरू कोण होणार याबाबत चर्चा रंगल्या आहेत. कुलगुरूपदाची निवड प्रक्रिया लवकरच सुरु होणार असून, त्यासाठी कुलपती विद्यासागर राव निवड समिती नेमणार असल्याची माहिती मिळतेय.
मुंबई विद्यापिठाची डागाळलेली प्रतिमा सुधारण्याचं आव्हान आता नवीन कुलगुरूंवर असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा देणं आणि विद्यापीठाचं प्रशासकीय कामकाज सुधारणं, या प्रमुख जबाबदा-या नवीन कुलगुरुंवर असणार आहेत.
सध्या कोल्हापूरमधल्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर देवानंद शिंदे यांच्यावर मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नोव्हेंबरमधल्या पदवी परीक्षा सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी त्यांच्यावरच सोपवण्यात आली आहे. मात्र 160 वर्षांचा इतिहास असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी विराजमान होण्यासाठी, मुंबईतून अनेकजण इच्छूक असल्याची चर्चा आहे.
डॉ. सुहास पेडणेकर, प्राचार्य, रुईया महाविद्यालय
डॉ. नीरज हातेकर, संचालक, अर्थशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ
डॉ. नरेश चंद्रा, प्राचार्य, बिर्ला महाविद्यालय