www.24taas.com, पुणे
स्वातंत्र्यसेनानी आणि देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या पणतूनं आपल्या बहिणाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा केलाय. मौलानांचा हा पणतू म्हणजे अभिनेता आमिर खान...
आता आमिर खानला काही वेगळ्या ओळखीची गरज नाही. पण मौलाना आझाद यांचा पणतू असं संबोधण्याचं कारण म्हणजे आमिरनं त्यांच्या आठवणीला दिलेला उजाळा... तोही आपल्या बहिणीच्या वाढदिवसानिमित्त... यंदाचा रक्षाबंधन आमिरसाठी खास होता. कारण, रक्षाबंधनाच्या लगोलग त्याच्या मोठ्या बहिणीचा... निखतचा... वाढदिवस होता. निखतचा ५० वा वाढदिवस नुकताच पुण्यात साजरा करण्यात आला. यानिमित्तानं आयोजित केलेल्या पार्टीत आमिरचं संपूर्ण कुटुंब एकत्र आलं होतं. आपल्या बहिणीसोबत हा दिवस सेलिब्रेट करण्यासाठी त्यानं आपले परदेशवारीचे प्लॅन्सही पुढे ढकलले होते.
‘परफेक्शनिस्ट’ आमिर खानला आपल्या बहिणीचा ५० वा वाढदिवसही आगळ्या-वेगळ्या ढंगात सेलिब्रेट करायचा होता. मग, त्यानं निवडलं एक जगावेगळं गिफ्ट... हे गिफ्ट होतं, आमिरचे आणि निखतचे पंजोबा मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या पाच भाषणांचा संच... हे गिफ्ट निखतसाठी अर्थातच इतरांपेक्षा वेगळं आणि अधिक महत्त्वाचं ठरलं.
.