www.24taas.com, मुंबई
'धक धक गर्ल' माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने हे आता गरिबांच्या ह्रदयाची धडधड तपासताना दिसणार आहेत... तेही परळच्या ‘केईएम’ या सरकारी हॉस्पिटलमध्ये... शनिवारी सकाळीच केईएम हॉस्पिटलमधल्या रुग्णांना आश्चर्याचा धक्का बसला तो डॉ. श्रीराम नेने यांच्या ‘सप्राईज व्हिजिट’मुळे... श्रीराम यांनी यावेळी हॉस्पिटलमधल्या काही हार्ट पेशंटना भेट दिली.
२०११ मध्ये आपली पत्नी अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि आपल्या दोन मुलांसोबत भारतात परतलेल्या डॉ. श्रीराम नेने हे लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या केईएम हॉस्पिटलमध्ये रुजू होणार आहेत. कार्डियाक सर्जन डॉ. नेने यांना भारतात परतल्यानंतर मुंबईतील अनेक फाईव्ह स्टार हॉस्पिटल्समधून नोकरीची ऑफर दिली गेली होती. पण, नेने यांनी मोठ्या पगाराच्या या ऑफर धुडकावून लावत सरकारी हॉस्पिटलमध्ये नोकरी करण पसंत केलंय. शनिवारी डॉ. नेने यांनी केईएम हॉस्पिटलचे डीन संजय ओक यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी चार तासांत केईएमच्या कार्डियाक विभागाच्या डॉक्टर्स आणि रुग्णांना भेट दिली. महागड्या हॉस्पिटल्सपेक्षा या सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.
मुंबईच्या हरकिसनदास, कोकिलाबेन अंबानी आणि हिरानंदानीसारख्या हॉस्पिटल्समधून डॉ. नेने यांना याआधी ऑफर मिळाल्या होत्या. पण, डॉ. नेने हे आता कॉर्पोरेट नोकरी करण्यास कंटाळलेत त्यापेक्षा त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये आपली सर्जनता चोखण्यास जास्त थ्रील वाटतंय. केईएमचे डीन डॉ. ओक यांनी डॉ. नेने केईएममध्ये रुजू होण्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. पण, इथं रुजू होण्यासाठी नेनेंना अगोदर महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलचा सभासद व्हावं लागणार आहे. त्यासाठी नेनेंनी महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलकडे अर्जही दाखल केलाय.
सेंट लुईस इथल्या ‘वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन’मधून पदवी प्राप्त केली आहे. भारतात परतण्यापूर्वी कोलरॅडो इथल्या डेन्वेरच्या ‘रॉकी माऊन्टेन कार्डिओव्हॅस्कूलर’ इथं प्रॅक्टीस करत होते. माधुरीनं फिल्म इंडस्ट्रीमध्ये परत येण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये एक घरंही खरेदी केलंय.
.