राजेश खन्ना यांचा रेकॉर्डेड 'शेवटचा निरोप'

हिंदी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार राजेश खन्ना यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. मात्र निधनापूर्वी राजेश खन्ना यांनी आपलं कुटुंब आणि चाहत्यांसाठी एक संदेश रेकॉर्ड करून ठेवला होता. राजेश खन्ना यांच्या चौथ्याला हा संदेश ऐकवण्यात आला.

Updated: Jul 25, 2012, 07:33 PM IST

www.24taas.com, मुंबई

हिंदी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार राजेश खन्ना यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. मात्र निधनापूर्वी राजेश खन्ना यांनी आपलं कुटुंब आणि चाहत्यांसाठी एक संदेश रेकॉर्ड करून ठेवला होता. राजेश खन्ना यांच्या चौथ्याला हा संदेश ऐकवण्यात आला.

४० वर्षांपूर्वी ‘आनंद’ या त्यांच्या गाजलेल्या चित्रपटातही असाच एक मेसेज बाबू मोशाय म्हणजेच अमिताभ बच्चन याच्यासाठी आनंद रेकॉर्ड करतो. या संदेशात राजेश खन्ना यांनी अत्यंत काव्यात्मक पद्धतीने आपले विचार मांडले आहेत.

“माझ्या प्रिय मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो! मला भूतकाळात रमण्याची सवय नाही. गेलेल्या दिवसाबद्दल काय विचार करायचा? पण अनोळख्या मैफिलीत ओळखीचे चेहेरे भेटले की आठवणी ताज्या होतात. मी आज जो कुणी आहे, तो सटेज, थिएटरमुळेच आहे. माझं सिनेमात कुणीही गॉडफादर नव्हतं. मी ही तुमच्या आयुष्याचा एक भागीदार आहे. हे तुमचं प्रेमच होतं, म्हणूनच तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. मी हेच म्हणेन की खूप खूप धन्यवाद आणि माझे खूप खूप सलाम” असं या रेकाँर्डिंगमध्ये राजेश खन्ना म्हणाले आहेत.

Tags: