पेट्रोल दरवाढीविरोधात आज एनडीएनं संप पुकारलाय. महागाईनं पिचलेल्या जनतेचा मूक का होईना पण त्यांना पाठिंबा मिळतोय. पण, ‘भारत बंद’ची हाक आणि या बंदमुळे होणारं सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान भारतीय जनतेला मात्र नवीन नाही... एक नजर टाकूयात याआधी कधी कधी पुकारला गेला होता ‘भारत बंद’...
भारत बंदचा इतिहास...
26 सप्टेंबर 2002 - गुजरातमध्ये अक्षरधाम मंदिरावर झालेल्या आतंकवादी हल्ल्याविरोधात बंद
31 मार्च- 1 एप्रिल 2003 - व्हॅटविरोधात भारतभर व्यापा-यांचा बंद
23 नोव्हेंबर 2004- शंकराचार्य जयेंद्र सरस्वतींच्या अटकेच्या निषेधार्थ भारत बंद
1 फेब्रुवारी 2005 - सर्व्हिस टॅक्स आणि व्हॅटविरोधात बंद
21 फेब्रुवारी 2005 - व्हॅटप्रणालीच्या विरोधात व्यापा-यांचा भारत बंद
3 जुलै 2008 - जम्मू-काश्मीर सरकारच्या अमरनाथ श्राईन बोर्डाची जमीन परत घेण्याच्या निर्णयाविरोधात बंद
27 एप्रिल 2010 - महागाईविरोधात भारत बंद
5 जुलै 2010 - पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढवल्यामुळे भारत बंद
8 नोव्हेंबर 2010 - अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामांच्या भारत दौ-याविरोधात माओवाद्यांचा देशव्यापी बंद
1 डिसेंबर 2011 - किरकोळ विक्री व्यवसायात 51 टक्के विदेशी गुंतवणुकीस मंजुरी देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधासाठी भारत बंद
सार्वजनिक संपत्तीचं नुकसान
देशात संप आणि बंदचे हत्यार नेहमीच उपसलं जातं. यामुळे देशाचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान होतं. यासंदर्भातील आकडेवारीवर नजर टाकूयात...
देशात संप आणि बंदचा सुकाळ
वर्ष एकूण बंद
2008 336
2009 312
2010 305
2011 सप्टेंबरपर्यंत 96
बंदमुळे किती नुकसान ?
जुलै 2010
राज्य कोटी रुपये
महाराष्ट्र 1000
कर्नाटक 725
पश्चिम बंगाल 250
मध्य प्रदेश 150
केरळ 150
ओडिसा 150
बिहार 150
राजस्थान 60
2010 मध्ये संप आणि बंदमुळे देशाचे एकूण 2735 कोटी रुपयांचे नुकसान