एकीकडे महागाईचा भडका उडाला असताना पेट्रोलच्या किंमतीत कपात होण्याच्या शक्यतेने लोकांना थोडासा दिलासा मिळेल अशी आशा आहे. सरकारी तेल कंपन्या पेट्रोलच्या किंमतीत एक रुपया प्रति लिटर किंवा दीड टक्क्यांनी कपात करण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किंमतीत कमी झाल्याने रुपयाच्या घसरणीचा प्रभाव काहीसा ओसरला आहे.
तेल कंपन्यांनी या महिन्याच्या सुरवातीला पेट्रोलच्या किंमतीत 3.2 टक्क्यांनी कपात केली होती. गेल्या तीन वर्षात पहिल्यांदाच पेट्रोलच्या
किंमतींमध्ये कपात करण्यात आली. पेट्रोलच्या किंमती जून 2010 मध्ये नियंत्रणमुक्त केल्यानंतर पहिल्यांदाच किंमती कमी करण्यात आल्या.
आता सध्याच्या परिस्थितीत पेट्रोलच्या किंमती प्रति लिटर 85 पैशांनी कमी करता येतील कराचा त्यात समावेश केला तर त्या एक रुपयांनी कमी होऊ शकतात. पुढील दोन महिन्यात किंमतींच्या चढउतारांचा आढावा घेऊन किंमती कमी करण्या संदर्भात अंतिम
निर्णय घेण्यात येईल असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.