www.24taas.com, नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोल, डिझेलचे वाढलेल्या दरांच्या पार्श्वभूमीवर येत्या काही काळात पेट्रोल लिटरमागे चार तर डिझेलमध्ये दोन रुपयांनी पुन्हा दरवाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पेट्रोलचे दर गेल्या दोन महिन्यांपासून वाढलेले नाहीत. या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोल व डिझेलचे दर वाढले आहेत. त्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. पाच राज्य तसेच महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणुकांमुळे सरकारने पेट्रोल-डिझेलचे भाव वाढविले नाहीत. परंतु, आता पाच राज्यातील निवडणुका संपल्यानंतर ही दरवाढ होण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशातील निवडणुंकांचा अंतीम टप्पा पार पडल्यानंतरच पेट्रोल दरवाढीचा विचार करावा, अशी केंद्र सरकारने केलेल्या विनंतीनंतर ही दरवाढ लांबणीवर टाकल्याचे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या सरकारी क्षेत्रातील तेल कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.