www.24taas.com, नवी दिल्ली
राहुल गांधी यांच्यावर २०१० मध्ये एका मुलीचे अपहरण आणि बलात्कार यासारखे गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. समाजवादी पक्षाच्या माजी आमदाराने सर्वोच्च न्यायालयात खळबळजनक खुलासा केला आहे. समाजवादी पक्षाच्या श्रेष्ठींनी काँग्रेस महासचिव राहुल गांधी यांच्याविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यासाठी भरीस घातले होते, असे माजी आमदार किशोर समरिते यांनी म्हटले आहे.
२०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयात राहुल यांनी अमेठी येथील एका मुलीचे अपहरण आणि बलात्कार केल्याचा आरोप करुन समरिते यांनी जनहित याचिका दाखल केली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाने ही याचिक फेटाळून लावली आहे.
तसेच खोटे आरोप केल्यामुळे याचिकाकर्त्यांना ५० लाखांचा दंड ठोठावला असून त्यांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागामार्फत चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, समरिते यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.