सुषमांचा सरकारवर तुफानी हल्लाबोल

Updated: Dec 8, 2011, 10:13 AM IST

झी २४ वेब टीम, नवी दिल्ली

 

स्वराज यांच्या आक्रमक भाषणाने सत्ताधारी आघाडी घायाळ

झी २४ वेब टीम, नवी दिल्ली

संसदेचे हिवाळी अधिवेशनात महागाईवरुन संसदेत रणकंदन झालं. सरकारच्या धोरणावर विरोधकांचा हल्लाबोल चढवला. सुषमा स्वराज यांनी अर्थमंत्री प्रणब मुखर्जींवर निशाणा साधताना नियोजन आयोगाचा अहवाल हास्यास्पद असल्याचा म्हटलं. सरकार आकड्यांचा खेळ खेळत आहे, आकड्यांनी लोकांची पोटं भरणार नाहीत  असा घणाघातही स्वराज यांनी केला.

महाराष्ट्रात कापूस शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरुच आहेत तसंच यासाठी भाजपाचे आमदार गिरीश महाजन यांनी केलेल्या उपोषणाची आठवणही त्यांनी संसद सदस्यांना करुन दिला. सरकारच्या आयात आणि निर्यात धोरणावर टीका करताना शेतकऱ्यांकडे धान्य असे पर्यंत निर्यातबंदी असते. आणि व्यापाऱ्यांकडे धान्य पोहचल्यानंतर निर्यातबंदी उठते असे सरकारी धोरणाचे वाभाडे स्वराज यांनी आपल्या भाषणात काढले. हरियाणा, उत्तर प्रदेशात बासमतीचा प्रश्नाने शेतकरी हवालदिल झाला आहे याकडे स्वराज यांनी लक्ष वेधले. केवळ चर्चेने महागाई दूर होणार नाही.

 

फेरीवाल्यांच्या कमाईत वाढ झाली आहे याचा कधी विचार केला का ? तसेच फेरीवाले आणि ठेलेवाल्यांकडे कधी लक्ष देणार असा थेट सवालही त्यांनी केला. महागाई आपल्याच देशात वाढताना दिसते पण इतर गोष्ट्रींचे दर आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत नाही असा प्रश्न विचारत त्यांनी सत्ताधारी आघाडीला कोंडीत पकडलं. अर्थमंत्री प्रणब मुखर्जींनी यांनी या सर्व प्रश्नांना उत्तर देताना  सुषमा स्वराजांचे आरोप फेटाळले.