www.24taas.com, लखनऊ
उत्तरप्रदेशमध्ये हत्तीला लोळवलं
सिंहासनाच्या सेमीफायनलमध्ये मुलायम सिंह यादव, त्यांचा मुलगा अखिलेश यादव आणि समाजवादी पक्षाची सरशी झालीए. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षानं बसपाचा दारुण पराभव करून त्यांना सत्तेवरून खाली खेचलंय. त्यामुळे उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झालाय. सत्ताधारी बसपाची मात्र या निवडणुकीत खूपच पीछेहाट झालीय. भाजपा तिस-या स्थानी असून काँग्रेस चौथ्या स्थानी आहे.
पंजाब मध्ये काँग्रेस हद्दपार
पंजाबमध्ये अकाली दल आणि भाजपचा पुन्हा एकदा वरचष्मा राहिला आहे. सलग दुसऱ्यांदा सत्ताधारी पक्षानं सत्तेवर येण्याचा विक्रम पंजाबमध्ये झाला आहे. ४६ वर्षांनंतर हा विक्रम होतो आहे. काँग्रेसला याठिकाणी फटका बसला आहे. मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी जनतेचे आभार मानत विकासाच्या मुद्यावर पुन्हा सत्ता राखण्यात यश आल्याचं म्हटलं आहे.
उत्तर प्रदेश - बसप ८०, सप २२४, काँग्रेस ३७, भाजप ४७, अन्य १५
उत्तराखंड- काँग्रेस ३२, भाजप ३१, बसप ३, अन्य ४
पंजाब- काँग्रेस ४६, अकाली दल ६८, बसप ०, अन्य ३
गोवा - काँग्रेस ९, भाजप २४, अन्य ७,
मणिपूर -काँग्रेस ४२, एमपीपी १, अन्य १७
उत्तर प्रदेश - बसप ८०, सप २२४, काँग्रेस ३५, भाजप ४८, अन्य १६
उत्तराखंड - काँग्रेस ३१, भाजप ३२, बसप ३, अन्य ४
पंजाब - काँग्रेस ४६, अकाली दल ६८, बसप ०, अन्य ३
गोवा- काँग्रेस ९, भाजप २४, अन्य ७,
मणिपूर - काँग्रेस ४१, अन्य १७
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सत्ताधारी बहुजन समाज पक्षाला जबरदस्त हादरा बसला असून समाजवादी पक्षाने मुसंडी मारली आहे. समाजवादी पक्षाने २०२ या मॅजिक फिगरच्या पुढे २१६ जागांवर आघाडी घेतली आहे. या सत्तेच्या गणितात सप उत्तर प्रदेशात सरकार स्थापन करणार असून पुढील मुख्यमंत्री मुलायम सिंग होतील, असे समाजवादी पक्षाचे नेते आणि मुलायम सिंग यांचे सुपूत्र अखिलेश यादव यांनी स्पष्ट केले आहे.
उत्तर प्रदेशातील ४०३ जागांपैकी समाजवादी पक्ष २१६ जागांवर आघाडीवर असल्याने त्यांना बहूमत जवळपास मिळाल्याचे चित्र आहे. बसप -८१, भाजप-४७ आणि काँग्रेस ३७ आणि इतर १५ जागांवर आघाडीवर आहेत.
समाजवादी पक्षाला बहुमत मिळाले तर उत्तर प्रदेशचे पुढील मुख्यमंत्री मुलायम सिंगच होणार असल्याचे अखिलेश यादव यांनी स्पष्ट केले.
मायावती देणार राजीनामा
सपने घेतल्या आघाडीमुळे आपल्या पराभव निश्चित असल्याचे मुख्यमंत्री मायावती यांनी मान्य केले असून आज दुपारी ३ वाजता त्या राज्यपालांना भेटणार आहेत. यावेळी त्या राजीनामा देण्याची शक्यता आहे.
पंजाबमध्ये सलग दुसऱ्यांदा अकाली दलाची सत्ता कायम राहणार असे चित्र असून अकाली दलने ६१ जागांसह आघाडी घेतली आहे. तर त्यामुळे पंजाबमध्ये सत्ता स्थापनेचे काँग्रेसचं स्वप्न धुळीला मिळाले आहे. उत्तराखंडमध्ये भाजप २५ तर काँग्रेस ३६ जागांवर आघाडीवर आहे. मणीपूरमध्ये काँग्रेसने आपली आघाडी कायम राखली आहे.
गोव्यात काँग्रेसनेल विजयाचे खाते उघडले आहे. काँग्रेसचे माविन गुदिनो यांनी दाभोळी मतदार संघातून विजय मिळविला आहे. तर गोव्यात मुरगाव मतदार संघातून भाजपचे मिलिंद नाईक विजय मिळविला आहे. देशात