www.24taas.com, कल्याण
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीत मनसेने तटस्थ राहत शिवसेनेचा मार्ग मोकळा करुन दिला. त्यामुळेच शिवसेनेचे मल्लेश शेट्टी स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवडून आले आहेत.
ठाण्यात मनसेने शिवसेनेला महापौरपदाच्या निवडणुकीत थेट मदत केली होती. पण नाशिक महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने घेतलेल्या विरोधी भूमिकेने मनसेप्रमुख राज ठाकरे संतप्त झाले होते. त्यानंतर औरंगाबाद आणि ठाण्याच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मनसेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मदत केली होती. त्यामुळेच ठाण्यात राष्ट्रवादीकडे आणि औरंगाबादमध्ये काँग्रेसकडे जिल्हा परिषद अध्यक्षपद गेलं. औरंगाबादमध्ये तर जवळपास दशकानंतर काँग्रेसला अध्यक्षपद मिळवता आलं.
पण कल्याण स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत परत एकदा सेना आणि मनसेत समझोता झाल्याचं दिसून आलं आहे.